By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > देता की जाता की खाता लाथा
खामगावबुलडाणाबुलडाणा जिल्हाविदर्भ

देता की जाता की खाता लाथा

Team Batmivishwa
Last updated: May 3, 2025 11:39 am
By Team Batmivishwa
Published: May 3, 2025
खामगाव बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ
60 Views
4 Min Read
Share
4 Min Read
SHARE

The agitation will continue until the farmers are freed from debt: District Liaison Officer Prof. Narendra Khedekar

शेतकर्‍यांची कर्जमुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील : जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर

बातमीविश्व टिम
बुलडाणा
महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २ मे २०२५ रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चाने जिल्हा मुख्यालय बुलडाणा जाम होऊन गेले होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी घणाघाती हल्ला चढवत झोपेच सोंग घेतलेल्या महायुती सरकारला जागा करण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा असल्याचे सांगितले. देता की जाता की खाता लाथा अशाप्रकारे या आंदोलनाची भविष्यात व्याप्ती वाढवावी लागणार असल्याचे सांगून हा वनवा शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभरात पेटेल आणि शेतकर्‍यांची कर्जमुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असेही प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले.
जिजामाता प्रेक्षागार परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली.

Contents
The agitation will continue until the farmers are freed from debt: District Liaison Officer Prof. Narendra Khedekarशेतकर्‍यांची कर्जमुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील : जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकरशिवसेनेने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचा वणवा पेटवला- राज्य प्रवक्त्या अ‍ॅड.जयश्रीताई शेळकेमहायुतीने सत्ता मिळवली, आता ते सत्तेचे लोणी खाण्यात व्यस्त- आ.खरात

निवडणूक पूर्व काळात दिलेला आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे.शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने (उबाठा ) या प्रचंड धडक मोर्चातून महायुती सरकारला जाब विचारला. शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिवसेना (उबाठा) शिष्ट मंडळाने जिल्हाधिकार्‍यांना रीतसर सुपूर्त केले. तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षागार येथे पार पडलेल्या सभेत नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी जोश भरला. यावेळी संबोधित करताना नरेंद्र खेडेकर म्हणाले की, शेतकर्‍यांना निवडणुकीच्या वेळी वेगवेगळी आश्वासने दिली.

मात्र त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. कर्जमुक्ती हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे. आम्ही शेतकर्‍यांनी काही चोरी केली नाही. अदानी, अंबानी यांचं हजारो कोटींचं कर्ज माफ होत मग शेतकर्‍यांचं कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाही का? असा सवाल नरेंद्र खेडेकर यांनी केला. जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना पिक विम्यापासून अपात्र ठरवण्यात आले. काही शेतकर्‍यांना २०० रुपये,१५० रुपये असा विमा मिळाला.

ही शेतकर्‍यांची क्रूर थट्टा या सरकारने चालवली असल्याचे नरेंद्र खेडेकर म्हणाले. आम्ही नकली शिवसैनिक नाही, की सेटलमेंट करणारे नकली शेतकरी नेतेही नाही. शेतकर्‍यांसाठी शिवसेनेने आता वणवा पेटवला आहे. देता की जाता की खाता लाथा? असाही हल्लाबोल खेडेकर यांनी चढवला. केस गळती आणि नख गळती प्रकरणावरून विद्यमान केंद्रीय मंत्री जाधव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेवरून खेडेकर यांनी टीकेची झोड उठवली.

शिवसेनेने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचा वणवा पेटवला- राज्य प्रवक्त्या अ‍ॅड.जयश्रीताई शेळके

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू म्हणून महायुतीचे सरकार सत्तेत आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिलेला शब्द पाळणे म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकर्‍यांची कर्जमुक्ती केली. मात्र आताचे हे महायुतीचे सरकार अतिशय विश्वासघातकी आहे, असा हल्लाबोल शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केला. कर्जबुडव्या मोठ्या कंपन्या आणि उद्योगपतींचे कर्ज सरकारने राईट ऑफ केले म्हणजे एक प्रकारे माफच केल. मात्र उन्हातानात परिश्रम करणार्‍या मायबाप शेतकर्‍यांना सरकारने वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. विदर्भ- मराठवाड्यात गतकाळात अडीच हजारावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या सरकारला लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचा वणवा पेटवला आहे. या वणव्यात हे महायुती सरकार भस्मसात होईल असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.

महायुतीने सत्ता मिळवली, आता ते सत्तेचे लोणी खाण्यात व्यस्त- आ.खरात

आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, आता शेतकरी जागा झालेला आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. महायुतीतल्या एकतरी आमदाराने,नेत्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे का?असा सवाल त्यांनी केला. खोटी आश्वासने देऊन महायुतीने सत्ता मिळवली, आता ते सत्तेचे लोणी खाण्यात व्यस्त असून महायुतीचे हे सरकार फसवे आहे असेही आ.खरात म्हणाले. नाफेड ची खरेदी केंद्र बंद आहेत. अजूनही सोयाबीन शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. आता झोपेच सोंग घेणार्‍या सरकारच्या विरोधात शिवसेनेचे भगव वादळ पेटून उठले आहे. सूत्रसंचालन युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कर्‍हाडे व तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांनी केले.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर,आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख,सहसंपर्कप्रमुख महिला आघाडी जिल्हा संघटक डी एस लहाने, जिल्हा समन्वयक संदिप शेळके युवसेना जिल्हाप्रमुख नंदु कर्‍हाडे, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे,तालुका प्रमुख लखन गाडेकर,अशोक गव्हाणे शिवसेना, युवसेना महिला आघाडी, किसान सेनेचेपदाधिकारी व कार्यकर्ते व हजारो शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

You Might Also Like

बुलढाणा जिल्ह्यात ३५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी अर्ज मागविले
दर्पणकार स्व.सोमनाथ सावळे पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा १४ ऑक्टोबरला
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या महिला आरक्षण सोडतीची तारीख केली निश्चित
समृद्धी महामार्गावर  मंगळवारी तासभर वाहतूक बंद राहणार; बुलढाणा–जालना दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम
महाराष्ट्र दिनी अल्पवयीन मुलीस पळवून आणले; गुन्हा दाखल
TAGGED:The agitation will continue until the farmers are freed from debt: District Liaison Officer Prof. Narendra Khedekarआ.खरातप्रा. नरेंद्र खेडेकरबुलडाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेराज्य प्रवक्त्या अ‍ॅड.जयश्रीताई शेळके
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article पर्यावरण मित्र प्रदीप डांगे यांना पितृशोक
Next Article प्रामाणिकपणे काम करणार्‍या आशा वर्कर्स ताईवर उपासमारीची वेळ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up