मायेची हाक असते कविता
बापाची साथ असते कविता
बहिणीची माया असते कविता
प्रेमाची छाया असते कविता
पांडुरंगाचा अभंग असते कविता
मित्रांचा सत्संग असते कविता
सुखाची आस असते कविता
दुःखाचा सर्वनाश असते कविता
वखराची पास असते कविता
खळ्यातील ज्वारीची रास असते कविता…
– भगवान कानडजे पाटील
बुलढाणा
मो.९०११०२३४७०
